महाराष्ट्र
Trending

चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

पोहण्याचा मोह बेतला जीवावर

­

पोहण्याचा मोह बेतला जीवावर
चार पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

मुंबई :

  • रत्नागिरी शहरातील आरेवारे समुद्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जुनेद बशीर काझी (30 ओसवाल नगर), जैनब जुनेद काझी (28 ओसवाल नगर) उजमा समशुद्दीन शेख (17 मुंबई मुंब्रा) उमेरा शमशुद्धीन शेख (16 मुंब्रा) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत.
    समजलेल्या माहितीनुसार वरील चौघे हे रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथील रहिवासी असून, शनिवारी ते रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. या दरम्यान वरील चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. बुडालेल्या चार पर्यटकांपैकी तीन पर्यटक महिला तर एक पुरुष असल्याचं सांगितलं जात दरम्यान या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. सध्या पावसाची उघडावा व शनिवार रविवारच्या सुट्ट्या असल्याने समुद्रकिनारी पर्यटनासाठी पर्यटकांची वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आरे वारे समुद्रकिनारी शनिवार आणि रविवारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओसवाल नगर येथून चार पर्यटक आरे वारे येथे आले. हे चौघे समुद्रात पोहोण्यासाठी गेले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडाले व अवघ्या काही मिनिटांत चारही जण खोल समुद्रात बुडून मृत पावले.
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.