मी एक रुपयाचीही रम्मी खेळली नाही; माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार!
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे स्पष्टीकरण

http://I didn’t play rummy for even a rupee; my reputation is disgraced.नाशिक:
विधिमंडळाचं कामकाज सुरु असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून वादात सापडले आहे. वाढत्या वादामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा असतांनाच मात्र, आता ही चर्चा फोल ठरली असून, मला रम्मी खेळता येत नाही,त्यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक जोडावा लागतो. मी एक रुपयाचीही रम्मी खेळली नाही त्यामुळे मी दोषी नाही. दोषी असेल तर राजीनाम देईल असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे यांनी आज (ता.22 जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली. माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. तसेच महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असही यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले.