क्राईमजिल्हामहाराष्ट्र

सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून; दोन अल्पवयीन मुलांनेच खून केल्याचे उघड

भोकरदन येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ

जालना : 
   भोकरदन शहरातील मुलांच्या वसतिगृहात शिकणाऱ्या एका सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना (ता.२२) मंगळवार रोजी उघडकीस आली आहे. बालवीर अजय पवार (वय ७) रा.पाडळी तालुका परतुर जिल्हा जालना असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच दोरीने गळा आवळून या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोन विधी संघर्ष बालकांना भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार अजय पवार (रा.पाडळी) तालुका परतुर जिल्हा जालना हे पत्नी सखू व तीन मुलांसह मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यातील मुलगी गौरी पवार ही इयत्ता दुसरी व मुलगा बालवीर पवार हा इयत्ता पहिली वर्गाच्या शिक्षणासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून भोकरदन येथील श्री गणपती वस्तीगृहात दोघांचा प्रवेश घेतला होता. यातील बालवीर याचा आज (ता.२२) गळा आवळून खून करण्यात आला. त्याच्या गळ्याभोवती दोरीने आवळल्याचे दोन काळे व्रण दिसून आले असल्याचे त्याच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी वस्तीगृहातील वय ८ आणि वय १३ वर्षे अशा दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांनीच बालवीर याचा खून केल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

खेळखेळातून वाद अन् झाला खून.?

          दरम्यान, खेळताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलिस अधीक्षक या प्रकरणी तपास करत आहे. 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.