ताज्या घडामोडी
वडिलांनी लिव्हर दान दिलेल्या तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजी नगर येथील घटना

छत्रपती संभाजीनगर:
गतवर्षी वडिलांनी मुलीला लिव्हर दान करून तिला नवीन जीवनदान दिले होते. मात्र, हे नियतीला मान्य नव्हते. अज्ञात वाहनाने स्कुटीला दिलेल्या जोराच्या धडकेत स्कुटी वरील एक तरुणी ठार झाली असून, अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना छत्रपती संभाजी नगरच्या जालना करमाड महामार्गावर घडली.
विशाखा विश्वास वंजारे (२१) (रा.नक्षत्रवाडी, ता.पैठण) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सानवी भोलेनाथ शिंगारे (रा.बीड) आणि अपेक्षा राजेश जमदाडे (रा.गडचिरोली) असे जखमी झालेल्या तरुणींचे नावे आहे. वरील तीनही तरुणी काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी स्कुटी वरून जात असताना जालना रोडवर विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोराची धडक दिली. या अपघातात तीनही तरुणी गंभीर जखमी झाल्या, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी विशाखा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विशाखाचे वर्षभरापूर्वी लिव्हर प्रत्यारोपण; अन् काळाचा घालादरम्यान विशाखा हिचे गेल्या वर्षी यकृत निकामी झालं होतं त्यामुळे तिच्या वडिलांनी स्वतःचे लिव्हर करत तिला मृत्यूपासून वाचवल. प्रत्यारोपणनंतर विशाखा पूर्णपणे बरी झाली होती पुढे शिक्षणासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झाली. आणि सध्या पीपल्स फॉरेन सिक्स सायन्स महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. मात्र, नियतीनेच तिचे आयुष्य अपूर्ण ठेवले. अवघ्या वर्षभरात तिचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने वंजारी कुटुंबीयावर शोककळ पसरली आहे.