महाराष्ट्रराजकीय

एकनाथ खडसेंचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती सापडले रेव्ह पार्टीत.!

प्रांजल खेवलकरला याला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे :पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांनी छापेमारी केल्याची माहिती समोर आली असून, उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या या रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे ही रेव्ह पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. या पार्टीत प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.