ताज्या घडामोडी

कावड यात्रेला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; १८ भाविकांचा मृत्यू

झारखंडमधील देवघरमध्ये घडली दुर्दैवी घटना

टीम संग्रामभूमी :
श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. झारखंडमधील देवघरमध्ये ही अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रावण महिन्यात बाबा वैद्यनाथ धामला दरवर्षी हजारोंच्या संख्येने कावड यात्री जातात. अशीच एक कावड यांत्रींनी भरलेली बस देवघर-बासुकीनाथ मार्गावर जमुनिया चौकात आली असता एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ट्र्रॅव्हल बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. या अपघातात ट्र्रॅव्हल बसचा चालकाचा जागीच मृत्यू झाला. शिवाय बसमधील १७ जणांनीही आपला प्राण गमावला. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या देवघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया फॉरेस्ट परिसरात हा अपघात झाला. ही बस गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर धडकली. कावड यात्रेकरूंनी भरलेली ही बस बाबा बैद्यनाथ धाममध्ये जलाभिषेक केल्यानंतर दुमका येथील बासुकीनाथ मंदिराकडे जलाभिषेक करण्यासाठी जात होती. पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास ही बस मोहनपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जमुनिया परिसरात आली. त्यावेळी अचानक एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.