शिवरुद्र योगी महाराज बसले संजीवन समाधीसह अमरण उपोषणाला
शासकीय गायरानातील बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासित करण्याची मागणी

भोकरदन : तालुक्यातील खादगांव येथे शासकीय गायरानातील बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासित करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने परमपुज्य शिवरुद्र योगी महाराज यांनी गुरुवारी (ता.३१) रोजी खादगांव येथील शिवशक्ती कैलास आश्रम महाकालेश्वर मंदिरासमोर एक खड्डा करून संजीवन समाधीसह अमरण उपोषणा सुरु केले आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील खादगांव येथील शासकीय गायरान गट क्र. ५७ मध्ये ९० एकर जमीन आहे. या जमिनीत काही लोकांनी चार चार पाच पाच एकर ताबा करून मंदिर परिसरातील जमिनीवरही अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी शिवशक्ती कैलास आश्रम असून, येथे भव्य मंदिर उभारण्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे. तसेच या गायरान जागेसाठी शिवशक्ती कैलास आश्रमासाठी शासनाकडून रितसर मिळवण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहे. यात चार ते पाच लोक नेहमी मंदिराच्या कामाच्या ठिकाणी जनावरांना घेऊन येतात व येथे घाण करतात. सदरील लोकांनी ताब्यातील आश्रमाच्या गायरान जागेवर जबदस्तीने ताबा केला असून, आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन आम्ही उभारलेले मंदिर पाडण्याचे भाषा वापरीत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांचे बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासित करुन शासनाने सदर गायरान ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली आहे. अनेकदा निवेदने देत मागणी करूनही महसूल प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने त्या लोकांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे मी खादगाव येथील शिवशक्ती कैलास आश्रम महाकालेश्वर मंदिरासमोर संजीवन समाधीसह अमरण उपोषणा शिवरुद्र योगी महाराज यांनी सुरु केले असल्याची त्यांनी सांगितले.
आता कारवाई झाल्याशिवाय माघार नाही – शिवरुद्र योगी महाराज
खादगांव येथील सरकारी गायरान गट क्र.५७ मधील बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासित करण्याची मागणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक वेळा केली. मात्र, याकडे सतत त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या लोकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे संजीवन समाधीसह अमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत अतिक्रमणावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी आता मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका महाराजांनी घेतली आहे.