जालना जिल्ह्यातील आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जालना प्रतिनिधी:
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी (ता.३१) गुरुवारी जालना जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यासह जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून, त्याठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील आठ सहायक पोलीस निरीक्षक यांच्या यामध्ये बदल्यात समावेश आहे. त्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या गोदाकाठच्या तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर जाफराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांची तिर्थपुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली असून, त्यांच्या जागी तालुका जालना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. मंठा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांची मंठा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांचे वाचक चंद्रकांत चातुरे यांची जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.