ताज्या घडामोडी

एका, दुर्री , तिर्रीमुळे खुर्ची बदलली.?

दत्तात्रय भरणे यांना कृषी मंत्री पदाची लॉटरी !

मुंबई :   देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. त्यामुळे एका, दुर्री , तिर्रीमुळे खुर्ची बदलली.? अशी चर्चा होत आहे.

विधिमंडळात रम्मी खेळणं आणि शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य यामुळे महायुतीचे सरकार अडचणीत आले होते. अखेर ३१ जुलै २०२५ रोजी फडणवीस सरकारमध्ये दोन फेरबदल करण्यात आले. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेत त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओ व वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राज्यभर विविध आंदोलने करण्यात आली होती. यामुळे त्यांच्याकडील कृषी खाते काढण्यात आल्याची चर्चा आहे. ३१ जुलै रोजी रात्री राज्य सराकरकडून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय महायुती सरकारमधील कामगिरी आणि पारदर्शकतेच्या निकषांवर घेतल्याचे सांगितले. कोकाटे यांनी रम्मीऐवजी सॉलिटेअर खेळत असल्याचा दावा केला होता, परंतु विरोधकांनी त्यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला. नवे कृषिमंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा खात्याची जाबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विरोधकांकडून पाच मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. यामध्ये योगेश कदम, संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा होती, परंतु केवळ कोकाटे यांच्याच खात्यात बदल करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ हे खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवरही टीका झाली होती. मात्र, पण त्यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.