आमदार संतोष दानवे यांच्याकडून संग्रामभूमीला शुभेच्छा !

आमदार संतोष दानवे यांच्याकडून संग्रामभूमीला शुभेच्छा !
भोकरदन: भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे यांच्याकडून ‘संग्रामभूमी’ला प्रथम अंक प्रकाशनाबद्दल शुभेच्छा मिळाल्या आहे.
“जनसामान्यांच्या प्रश्नांची निर्भीड मांडणी करणाऱ्या ‘संग्रामभूमी’ला यशस्वी वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! पत्रकारितेचा हा लढा सदैव तेजस्वी राहो,” असे आमदार दानवे यांनी म्हटले. संग्रामभूमी हे मराठी साप्ताहिक लोकशाही मूल्यांवर आधारित पत्रकारितेचे साधन असून, ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरो. शिवाय
डिजिटल”नवमाध्यमांच्या युगात ‘संग्रामभूमी’सारखे डिजिटल व्यासपीठ सामाजिक जाणिवा जपत पत्रकारितेचा जागर करत आहे, ही आनंदाची बाब आहे. लोकशाहीच्या मजबुतीसाठी अशा निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेची नितांत गरज आहे. संग्रामभूमीच्या डिजिटल प्रवासास देखील हार्दिक शुभेच्छा,” असे आमदार संतोष दानवे म्हणाले.
संग्रामभूमी डिजिटल पोर्टल हे ग्रामीण, सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर सडेतोड आणि तथ्याधारित वार्तांकन करणारे एक विश्वासार्ह माध्यम म्हणून उदयास येत आहे. गावागावातील जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.