ताज्या घडामोडी

“दो हंसो का जोडा” स्व.विलासराव देशमुख आणि स्व गोपीनाथराव मुंडे 

राजकारणातली अपूर्व मैत्री 

जालना:  राजकीय मतभेद असले, तरी वैयक्तिक मैत्रीत एक विश्वासाचं, आदराचं आणि प्रेमाचं नातं जपणं ही गोष्ट फार दुर्मिळ असते. महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. विलासराव देशमुख आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांची मैत्री हे याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरलं.

एक जण काँग्रेसचा मुख्यमंत्री, तर दुसरा भाजपचा विरोधी पक्षनेता — पण दोघंही एकमेकांविषयी अपार आदर बाळगणारे. विरोधी बाकांवरून कठोर टीका करताना देखील त्यांची वैयक्तिक नाती मात्र सदैव हसरी, स्नेहपूर्ण आणि आदरयुक्त राहिली. राजकीय सभांमध्ये शाब्दिक टोलेबाजी असली तरी, सभेबाहेर दोघांची मैत्री ही ‘महाराष्ट्राच्या राजकारणात सौहार्दाचं प्रतीक’ बनली. विलासराव देशमुख – काँग्रेसचा प्रगल्भ, अनुभवी, समन्वयी नेतृत्व गोपीनाथ मुंडे भाजपचा जमिनीवरचा नेता, ठाम पण जनतेशी जोडलेला सत्तेत एकमेकांविरोधात उभे असतानाही, दोघंही एकमेकांविषयी कधी कटुता ठेवत नसत. त्यांच्या संबंधात सतत स्नेह, सौहार्द आणि व्यंगचित्रातील हास्य असायचं. एकमेकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं, विनोदात मैत्री जपणं, आणि गरजेच्या वेळी पाठिशी उभं राहणं – ही त्यांच्या संबंधांची खासियत होती.त्यांची मैत्री म्हणजे “विचार वेगळे पण मनं जोडलेली!”आजच्या राजकीय वातावरणात ही गोष्ट म्हणजेच एक आदर्श आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज झाले, पण काही नेते असे होते ज्यांच्या नेतृत्वात लोकांनी विश्वास ठेवला, आणि त्यांच्या कार्याने जनतेच्या मनात कायमचा ठसा उमटला. दोघांचे पक्ष वेगळे, विचार भिन्न — पण तरीही दोघांमधील वैयक्तिक मैत्री, परस्पर आदर आणि सहकार्याचे संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले. आजच्या राजकीय वातावरणात, जिथे विरोध म्हणजे वैर समजले जाते, तिथे विलासराव-गोपीनाथ यांची मैत्री आणि त्यांचे नेतृत्व हे नव्या पिढीच्या नेत्यांसाठी आदर्श आहे

त्यांच्याविषयी थोडक्यात..

विलासराव देशमुख – ग्रामिण भागातून आलेले, पण अत्यंत शहरश्रीमंत आणि समन्वयी राजकारणाचे उदाहरण. मुख्यमंत्रीपद भूषवताना त्यांनी प्रशासनात संयम, विनोदबुद्धी आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची शैली जपली.

गोपीनाथ मुंडे – सामान्य कार्यकर्त्यांमधून पुढे आलेले, ठाम मतांचे, पण नेहमी जनतेशी जोडलेले नेतृत्व. विरोधी पक्षात असो वा सत्तेत, त्यांनी ग्रामीण जनतेचा आवाज विधानसभेत नेहमी बुलंद ठेवला.

या दोघांना “संग्रामभूमी” टीम कडून “मैत्री दीना” निमित्ताने विनम्र अभिवादन.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.