ताज्या घडामोडी

‘अ‍ॅट्रॉसिटी’ चा गुन्हा दाखल करण्यास पुणे पोलिसांचा नकार

पुण्यातील तीन मुलींचं छळ प्रकरण

पुणे : छत्रपती संभाजीनगरच्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान तीन मुलींना पोलिसांनी विनाकारण डांबून ठेवले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी संबंधित मुलींनी पुणे पोलिस आयुक्तालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.मात्र, पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला.
महत्त्वाचे म्हणजे मध्यरात्री तीन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. मात्र, पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे निषेध म्हणून आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांकडून देण्यात आलेला नकाराचा पत्रस्वरूप कागद आयुक्तालयातच फाडून जाहीर निषेध केला. या आंदोलनात सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासह वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान जवळपास चार दिवसांपासून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना पोलिस मात्र, टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, ते नेमके कुणाच्या सांगण्यावरून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.