जिल्हाताज्या घडामोडी

भोकरदन तालुक्यात बिबट्याची दहशत ; शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपळगाव रेणुकाई परिसरात बिबट्याचा वावर

भोकरदन: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात मागील काही महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने आता पिंजऱ्याची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान पिंपळगाव रेणुकाई गाव परिसरात या बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लावलेला सापळ्यानुसार बिबट्याने ज्या ठिकाण वावर केला आहे, अशा ठिकाणी आता लोंखडी पिजरा लावण्यात आला आहे. वनरक्षक ज्ञानेश्वर पवार हे पथकासोबत घटनास्थळी ठाण मांडून आहे.
मागील जवळपास चार महिन्यांपासून बिबट्याने पिंपळगाव रेणुकाई शिवारात हैदोस मांडला आहे. शिवाय या भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजच कुठे ना कुठे बिबट्या दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात तीन कुत्र्यांची व दोन हरणांची शिकार झाली. तेव्हापासून शेतकऱ्यांनी राञीचे तर शेतात जाणे बंद केले आहे. एकीकडे परिसरात पाऊस नाही. पिके सुकु लागत असल्याने शेतकऱ्यांना पिंकाना पाणी देणे गरजेचे आहे. माञ, राञीची लाईट असल्याने बिबट्याचे धाकाने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी देखील अडचणी येत आहे. त्यामुळे खरिपातील पिके देखील धोक्यात आली आहे. चार दिवसापूर्वी वनविभागाने २२ जणांचे कर्मचाऱ्यांचे पथक पिंपळगाव शिवारात आले होते. यावेळी सदर अधिकाऱ्यांनी ज्या भागात शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. यांच्या शेतात भेट देऊन पंचनामा केला. शिवाय ज्या भागात बिबट्या दिसून आला त्या भागाची पाहणी करत त्यांच्या पावलांच्या ठशांचा शोध लावीत टँप लावला होता.आता त्या ट्रेप मध्ये ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्या ठिकाणी आता लोंखडी पिंजऱ्याची व्यवस्था वनविभागाकाडून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.