क्राईम

भोकरदन पोलिसांनी “फिल्मी स्टाईल” पाठलाग करत संशयित चोरांना पकडले ; एक पोलीस कर्मचारी जखमी

पकडलेले तीनही संशयित जालन्यातील

भोकरदन : शहरात चोरट्यांनी उचापती सुरू केल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. आज मंगळवारी (ता.५) दुपारी काही संशयित पाकिटमार चोरटे शहरात फिरत असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक पवन राजपुत यांनी तातडीने काही पोलिस कर्मचारी सोबत घेत त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तीन संशयित पाकिटमार चोरांना ताब्यात घेतले आहे.
भोकरदन शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून पाकीटमार, भुरटे चोर, दुचाकी चोर तसेच मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत चोरटे हात सफाई करत आहे. अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली असताना आज मंगळवारी (ता.५) रोजी काही संशयित चोरटे भोकरदन शहरात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत मिळालेले लोकेशन गाठले त्या ठिकाणी काही संशयित व्यक्ती आढळून आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ते संशयित गाडी घेऊन शहरातील म्हाडा रोड दिशेने जोराने पळाले पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत व त्यांच्या पथकाने या चोरांचा पाठलाग केला दोन चोरटे पकडल्यानंतर एक संशयित म्हाडा रोडवर असलेल्या प्रभात इंग्लिश स्कूलच्या बाजूच्या शेतात पळत सुटला पोलिसांनी त्याचा “फिल्मी स्टाईल” पाठलाग करत अत्यंत धाडसी पद्धतीने चोराला अटक केली. या प्रकरणी एकूण तीन संशयित चोरटे ताब्यात घेण्यात आले असून, त्यात आकाश छोटू परदेसी (रा.बस स्टँडच्या पाठीमागे जालना,) सय्यद सोहेल सय्यद आलम (रा.माळीपुरा जालना) व सय्यद उस्मान (रा.किराडपुरा छत्रपती संभाजीनगर) असे संशयितांची नावे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांनी सांगितले. या कारवाईत पोलिस कर्मचारी शिवाजी जाधव, विकास जाधव, योगेश गवळी, दीपक इंगळे यांचा सहभाग होता. दरम्यान शहरात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, गुन्हेगारीला चाप बसवण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  1. पाठलाग करताना पोलिस कर्मचारी जखमी..
    दरम्यान शेतात घुसलेल्या चोरट्यांचा पाठलाग करताना योगेश गवळी हे पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्या पायाला जखम झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.