ताज्या घडामोडी

छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी

भोकरदन: भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मंत्रालयीन दालनात पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नु पी एम यांच्यासमवेत आमदार संतोष दानवे यांनी प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आज प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे निवासस्थान असलेला तत्कालीन वाडा व इतर ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात लवकरात लवकर भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून शासनास मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या. छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे हे ऐतिहासिक स्मारक मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासाची आठवण सदैव करून देत राहील, त्यासोबतच भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्याच्या वैभवांमध्ये आणखी भर पडेल असा विश्वास यावेळी आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केला.याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्रीमती शालगार, उपअभियंता बांधकाम प.स. भोकरदन संजय शेजुळ, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा प्रमोद जाधव, मुकेश पवार यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. नागरिक उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.