संतोष दानवे यांना भविष्यात भाजपमध्ये मोठी संधी – महसूल मंत्री बावनकुळे

भोकरदन: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोकरदन येथे (ता.९) शनिवारी रक्षाबंधन निमित्त आयोजित पदाधिकारी मेळाव्यात आमदार संतोष दानवे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. शिवाय पुढील काळात त्यांना भारतीय जनता पक्षात मोठी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बावनकुळे म्हणाले की,“तरुण नेतृत्व म्हणून संतोष दानवे हे पक्षासाठी अमूल्य ठेवा आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, विकासासाठीची धडपड आणि जनतेशी असलेले नाते पाहता त्यांना पुढील काळात पक्षात अधिक जबाबदाऱ्या मिळणार यात शंका नाही. संतोष दानवे यांनी विकासकामांमध्ये दाखवलेली झपाटलेली वृत्ती आणि जनतेशी असलेले घट्ट नाते पाहता ते “हिरा” आहेत असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.
याच वेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचाही विशेष उल्लेख करत सांगितले की, “रावसाहेब आमच्या सारख्या अनेक नेत्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभव, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि राजकीय दूरदृष्टीमुळे ते खरेच ‘पावरफुल नेता’ आहेत.” रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्षे जालना जिल्हा आणि मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या राजकीय अनुभवामुळे आणि दूरदृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प साकारले गेले. त्यांचा विकासाचा वेग आणि कार्यतत्परता हे राज्यातील इतर नेत्यांसाठी आदर्श आहेत.”
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, गणेश पाटील ठाले, भोकरदन मंडळ अध्यक्ष प्रा. रणवीरसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.चंद्रकांत साबळे, सोयगाव मंडळ अध्यक्ष दीपक जाधव, पिंपळगाव रेणुकाई मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे, माजी नगराध्यक्षा आशाताई माळी, तुकारामसेठ जाधव, गणेश फुके, विजय कड बालाजी औटी, अजिंक्य वाघ, शिवाजी सपकाळ, मुकेश चिने, सतीश रोकडे, दीपक मोरे, दीपक बोर्डे, रावसाहेब कोरडे, ऋषिकेश पगारे, संतोष वाघ, फुलसिंग शिंदे, शेख कयूम, सुरेश बनकर, समाधान शेरकर,लक्ष्मण मळेकर, विनोद मिरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बावनकुळे यांनी जिल्ह्यातील विकास योजनांचा आढावा घेत राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.