माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन शहरात भव्य तिरंगा यात्रा

भोकरदन :स्वातंत्र्य दिनानिमित्त आज भोकरदन शहरात, भोकरदन शहर मंडळ व सोयगाव देवी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेला शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यात्रेदरम्यान शेकडो युवक-युवतींनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणाबाजी करत मुख्य मार्गावरून जल्लोषात मार्गक्रमण केले. पारंपरिक वेशभूषा, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात वातावरण देशभक्तीने रंगून गेले.
या प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थित जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत देशाच्या विकासात सर्वांनी आपापली भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच, तिरंग्याचा सन्मान व राष्ट्रीय एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यात्रेचे आयोजन निर्विघ्न व उत्साहात पार पडावे यासाठी पोलिस प्रशासन, स्वयंसेवक व आयोजक मंडळाने उत्तम व्यवस्था केली होती.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सभापती लक्ष्मणराव दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, भोकरदन मंडळ अध्यक्ष प्रा. रणवीरसिंह देशमुख, गणेश ठाले, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.चंद्रकांत साबळे, माजी नगराध्यक्ष मुकेश चिने, विजय कड, भगवान खाकरे, सोयगाव मंडळ अध्यक्ष दीपक जाधव, सतीश रोकडे, दीपक मोरे, दीपक बोर्डे, विजय मतकर, रावसाहेब कोरडे, ऋषिकेश पगारे, कय्यूम शेख, गजानन राऊत, सुनील पाथरे, विजय बोर्डे, अजिंक्य वाघ, शिवाजी सपकाळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.