जिल्हा

दिलासा..! दमदार पावसाने जुई मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ

भोकरदनसह तीस गावांना दिलासा

संग्रामभूमी न्यूज नेटवर्क

भोकरदन :
भोकरदन शहरासह तालुक्यातील पंचवीस गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. 30 टक्के म्हणजे आठ फूट इतका जलसाठा जमा झाल्याने भोकरदनकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट महिना लागूनही अपेक्षित पाऊस नसल्याने जुई धरण रिकामेच होते. केवळ महिनाभर पुरेल एवढाच साठा शिल्लक होता. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतू, रविवारी व सोमवारी सिल्लोड तालुक्यासह जुई धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने या भागातून वाहणाऱ्या जुई नदी व लहान मोठ्या वढे, नाल्यांना मोठा पूर गेला. त्यामुळे जुई धरणातील जलसाठ्यात मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत २९ टक्के इतका जलसाठा जमा झाला होता.या धरणात आवक सुरू असल्याने उद्यापर्यंत हे धरण ५० टक्के भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

तालुक्यातील या गावांना दिलासा…
दरम्यान पावसाळ्याच्या तीन महिन्यानंतर का होईना परंतू, जुई मध्यम प्रकल्पात समाधानकारक वाढ झाल्याने भोकरदन शहरासह दानापूर, दहेड, सुरंगळी, सुरंगळी वाडी, मूर्तड, वाडी, कठोरा बाजार, वाकडी, कुकडी, करजगाव, कल्याणी, सिपोरा बाजार, रेलगाव, बाभूळगाव, विरेगाव, भायडी, तळणी, पिंपळगाव रेणूकाई, रामेश्वर कारखाना, दगडवाडी आदी गावांना दिलासा मिळाला आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.