भोकरदन पोलिस ठाण्यात भास्कर जाधव यांचा सत्कार
पदोन्नतीनंतर निरीक्षक बिडवे यांच्या हस्ते स्टार परिधान

भोकरदन : तालुक्यातील केदारखेडा येथील रहिवासी व गेल्या काही वर्षांपासून भोकरदन पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भास्कर जाधव यांना राज्य शासनाने पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. या यशाबद्दल सोमवारी पोलिस ठाण्यात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी स्वतः जाधव यांच्या खांद्यावर स्टार परिधान करून त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी बिडवे यांनी जाधव यांच्या प्रामाणिक व शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत, राकेश नेटके आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. भास्कर जाधव हे मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या या पदोन्नतीमुळे भोकरदन पोलिस ठाण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.