सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांच्या सजगतेने वाचले वृद्ध गाईचे प्राण.!
महेश भैय्या पुरोहित व सांडू पाटील नामदे यांचे कौतुक

भोकरदन : पवित्र श्रावण महिना सुरू असताना बुधवार (ता.२०) ऑगस्ट रोजी एक वृद्ध व थकलेली गाय कत्तलीसाठी जात असल्याचा संशय आला. तोंडातून जीभ बाहेर पडलेली, कानावर जखमा झालेल्या व पूर्णपणे अशक्त अवस्थेत असलेली ही गाय अन्नाच्या शोधात व्याकुळ दिसत होती.
ही बाब लक्षात येताच प्राणीमित्र व सामाजिक तसेच धार्मिक कार्यात नेहमी अग्रणी असणारे शिवसेना उबाठा गटाचे शहराध्यक्ष महेश भैय्या पुरोहित व भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव सांडू पाटील नामदे यांनी तत्काळ पुढाकार घेत गायीची सुटका करून घेतली. त्यांच्या या दयाळू व मानवतावादी कृतीमुळे परिसरात समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
श्रावण महिना हा शिवपूजेचा व उपासनेचा कालावधी मानला जातो. हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाईला ‘कामधेनू’चे स्वरूप देऊन तिला मातेसमान सन्मान दिला जातो. अशा पवित्र महिन्यात एका असहाय गायीचे प्राण वाचवणे ही केवळ सेवा नसून धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची व पुण्याची गोष्ट मानली जाते.
या संवेदनशील कृतीबद्दल स्थानिक नागरिकांनी महेश भैय्यांचे सांडू पाटील नामदे यांचे कौतुक केले असून, “श्रावण महिन्यात केलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. महत्वाच म्हणजे या गाईला पत्रकार सांडू पाटील नामदे यांनी स्वतः सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा चारा-पाणी उपचारांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रावणात गाईची सुटका झाली, पण प्रश्न अजूनही तसाच आहे…
केवळ धर्माच्या नावावर राजकारण करणारे नेते आणि सोशल मीडियावर गोहत्या विषयी ज्ञान झोडपणारे तथाकथित जाणकार, खऱ्या संकटाच्या वेळी मात्र कुठे दिसत नाहीत? धर्म, राजकारण आणि दिखावा बाजूला ठेवून जर समाजाने खरी जबाबदारी घेतली, तरच गोमातेचे रक्षण होऊ शकते, असा भावनिक सूर लोकांमध्ये उमटत आहे.