भोकरदन शहरात पोळा सण उत्साहात साजरा

भोकरदन :
शेतकऱ्यांचा स्नेहसोहळा आणि बैलशेतीच्या परंपरेचे प्रतीक असलेला पोळा सण भोकरदन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागात बैलांची सजावट, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यामुळे सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस परिसरातील पोळ्यात देशमुख गल्लीतील बैलांना विशेष मान असतो. रंगीबेरंगी सजावट, पितळी घंटे, फडफडणाऱ्या पताका व पारंपरिक वेशभूषा अशा थाटामाटात या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील नागरिक, लहान मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलांचा मान पाहण्यासाठी गर्दी करून होत्या.शेतकरी बांधवांनी बैलांना पुरणपोळी, हरभरा, गूळ यांचा नैवेद्य अर्पण करून बैलांची पूजा केली.संपूर्ण शहरात पोळ्याच्या निमित्ताने ऐक्य व उत्साहाचे वातावरण पसरले होते.माजी नगरसेवक प्रा रणवीरसिंह देशमुख यांच्या घरी देखील पोळ्यानिमित्त बैलांची पारंपारिक पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी पवन सिरसाठ, भूषण देशमुख, स्वप्नील देशमुख, गजानन सिरसाठ आदी उपस्थित होते.