महाराष्ट्र
कन्नड तालुका हळहळला..! वीज पंप बंद करताना शॉक; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

संग्रामभूमी न्यूज नेटवर्क :
छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे पोळा सणाच्या दिवशीच झालेल्या एका भीषण घटनेने गावात हळहळ पसरली आहे. शेतात वीज पंप बंद करताना लागलेल्या विजेच्या शॉकमुळे संदीप चतरसिंग राजपूत (वय २३) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप राजपूत शुक्रवार सायंकाळी शेतातील पंप बंद करण्यासाठी गेला असता अचानक त्याला शॉक बसला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शेवगण यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
पोळ्याच्या आनंदमय सणावर दुःखाचे सावट पसरवणारी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, गावकुसात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.