सिपोरा बोरगाव शिवारातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

भोकरदन :
भोकरदन तालुक्यातील सिपोरा बोरगाव शिवारात सोमवारी (ता.२५) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. गावाजवळील विहिरीत एका तरुणाने उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. विहिरीत पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शोधकार्याला वेळ लागला. अखेर दुपारी साडेचारच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तोफिक शकील मिर्झा वय 22 (रा. बदनापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण हा बदनापूर तालुक्यातील रहिवासी असून, तो सिपोरा बाजार येथे नातेवाईकांकडे आला होता. त्याने विहिरीत उडी का घेतली याचे कारण स्पष्ट झालेले नसून, तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शोधकार्यासाठी भोकरदन नगर पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. यात रईस कादरी, कैलास जाधव, मोसिन बेग, वाजिद शेख यांचा समावेश होता.