“प्लास्टिक पृथ्वीचा शत्रू” या भूमिकेत समर्थ सोळंके चमकला
भोकरदन: केंब्रिज किड्स गुरुकुल शाळेच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत पटकावले बंपर बक्षीस

भोकरदन
भोकरदन शहरातील केंब्रिज किड्स गुरुकुल शाळेत (ता.२६) मंगळावर रोजी दिमाखदार फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहानग्यांनी आपल्या कल्पकतेचा, वक्तृत्वाचा आणि अभिनय कौशल्याचा सुरेख संगम घडवून आणत प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत सीनियर केजीमध्ये शिकणाऱ्या “समर्थ ज्योती दीपक सोळंके” याने सादर केलेली “प्लास्टिक पृथ्वीचा शत्रू” ही भूमिका विशेष आकर्षण ठरली. समर्थने स्वतःच्या वेशभूषेतून व प्रभावी संवादातून प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. या संदेशपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांनी व उपस्थित पालकांनी भरभरून दाद दिली. त्याच्या उत्कृष्ट कलेमुळे त्याला प्रथम बंपर बक्षीस म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते (सायकल) देण्यात आली. या स्पर्धेसाठी सकाळपासूनच रंगीबेरंगी वेशभूषेत सजलेले लहानग्यांचे आगमन झाल्याने संपूर्ण वातावरण बालमय झाले होते. विद्यार्थी डॉक्टर, शेतकरी, सैनिक, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा अनेक विविध वेशभूषेत साकारले होते. प्रत्येक सादरीकरणामध्ये देशभक्ती, सामाजिक भान व पर्यावरण संरक्षणाचे संदेश गुंफलेले दिसले.
या स्पर्धेत खालील चिमुकल्यांनी बक्षीस जिंकले.
नर्सरी मधून मितांश अंकिता आकाश पांडे (प्रथम), दिव्यम भाग्यश्री रोहित बाकलीवाल (द्वितीय), उजागरे श्रेयांक भाग्यशाली सचिन (तृतीय)
तर जुनिअर केजीतून शिवांश आरती शंकर बेडवाल (प्रथम), अद्वित स्वाती प्रेमनाथ काळे (द्वितीय), समर्थ रोहिणी संतोष ढगे (तृतीय)
तसेच सिनियर केजीतून कियांश अंचल राहुल परदेशीं (प्रथम), आदित्य स्वाती नानासाहेब भागवत (द्वितीय), अन्वित ललिता विशाल धनावत (तृतीय)
आणि
पहिल्या वर्गातून वैदेही वैशाली प्रवीण मानकपे (प्रथम), भाविका रुचिका प्रणव थारेवाल (प्रथम), आयुष मीना करनसिंग बैनाडे (द्वितीय) आणि शौर्या कविता सुनील सिंगल हिने तिसरा क्रमांक मिळवला.
यावेळी केंब्रिज शाळेचे अध्यक्ष संतोष पाटणी, आदर्श शाळेच्या अध्यक्षा डॉ सुनीताताई सावंत, मेघा शाह शिवसेना महिला तालुकाध्यक्ष सिल्लोड, केंब्रिज सिल्लोड शाळेच्या प्राचार्य नंदिता गजांकुशे, किड्स गुरुकुल शाळेच्या मुख्याध्यापक सोनल पाटणी, धनश्री पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून जॉय सर आणि जननी मॅडम यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी वैशाली पालकर, वैभवी वड्डे, मनिषा मिसाळ, श्वेता शर्मा, अश्विनी सोनूने, ज्योती पिंपळे, कविता नाडे, जफर मदनी, यासह प्रेम बाकीवाल, राहुल विसपुते वैशाली खाडे आदींनी परिश्रम घेतले.