जिल्हा

गायीची कत्तल व्हिडीओ प्रकरणी तिघांना अटक ; जालना पोलिसांची धडक कारवाई

आयटी ॲक्टसह संघटित गुन्हेगारी कलमे दाखल

जालना संग्रामभूमी वृत्तसेवा:
दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालना शहरात मोठी खळबळ उडाली होती. सदर व्हिडीओवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात असलम महेमूद कुरेशी (रा. मंगळबाजार, जालना) व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच हे सर्व आरोपी फरार झाले होते.

फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यासह स्थागूशाच्या चार पथकांना बाहेरगावी—हैद्राबाद, खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर), मानवत, पाथरी (जि. परभणी) येथे रवाना करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे शेवटी पोलीसांनी मुख्य आरोपी असलम कुरेशी याला तसेच सोफीयान शेख समद (रा. चमडाबाजार, जालना) यास ताब्यात घेतले. याशिवाय यासीन रशीद कुरेशी (रा. राजणी, ता. घनसावंगी) यास देखील पकडण्यात यश आले.

या आरोपींवर सुरुवातीला महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच बीएनएस अंतर्गत कलमे लावण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (IT Act) कलमे वाढवून गुन्हा अधिक गंभीर करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप भारती व स्थागूशा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली सपोनि उबाळे, पोउपनि शैलेश म्हस्के, सचिन सानप, पोउपनि संजय गवई, पोहेकॉ जगन्नाथ जाधव, पोहेकॉ धनाजी कावळे, पोहेकॉ सुभाष पवार, पोहेकॉ शिवहरी डिघोळे, पोहेकॉ बाबा हरणे, पोहेकॉ नजीर पटेल, स्थागूशाचे पो.हे.कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत आडेप, पोहेकॉ सतीश श्रीवास, प्रशांत लोखंडे, पोहेकॉ शारदा गायकवाड, पोकॉ भगवान मुंजाळ, दुर्गेश गोफणे अजिम शेख, गणेश तेजनकर, राहूल कटकम, धंनजय लोढे,धिरज भोसले व चालक मोहन हिवाळे, कल्पेश पाटील, सद्दाम सय्यद यांचे मदतीने केली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.