जिल्हा
भोकरदन : जुई धरणाचा साठा ८५ टक्क्यांवर; पाटबंधारे खात्याकडून सतर्कतेचा इशारा
भोकरदन सह तीस गावांचा पाणी प्रश्न वर्षभरासाठी निकाली

भोकरदन :
भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्पात पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढून तो तब्बल ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने धरण १०० टक्के भरून सांडव्यातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाखालील गावांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, असा सावधानतेचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे.