“ढोल-ताशा, पारंपरिक नृत्य आणि घोषणांनी जालना दणाणले; बंजारा समाजाची ताकद दाखवली”

जालना शहर सोमवारी (दि.१५) बंजारा समाजाच्या घोषणांनी दणाणून गेले. “सी.पी. बेरार गॅझेट लागू करा, बंजार्यांना एसटी आरक्षण द्या” या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने बंजारा बांधवांनी ऐतिहासिक विराट मोर्चा काढत आपली ताकद दाखवून दिली.
सांस्कृतिक जल्लोषात आंदोलन
मंमादेवी मंदिर चौकातून सुरू झालेला मोर्चा मस्तगड, गांधी चमन, शनि मंदिर, उड्डाण पूल, नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीपर्यंत निघाला. पारंपरिक वेशभूषा, हलकीच्या तालावरचे नृत्य, गीतगायन, ढोल-ताशांच्या निनादामुळे मोर्चा सांस्कृतिक उत्सवाचे रूप धारण करूनही आंदोलनाची धार कायम ठेवली.
अंबड चौफुलीवरील इशारा
अंबड चौफुली येथे झालेल्या सभेत समाजातील नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिला –
-
महिनाभरात हैद्राबाद गॅझेट लागू करा.
-
अन्यथा मुंबईत विराट मोर्चा काढू.
-
तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाज बहिष्कार टाकेल.
उपोषणाला पाठिंबा
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाच दिवसांपासून श्रीकांत राठोड आणि हरीश राठोड हे बेमुदत उपोषणाला बसले असून, मोर्चातून या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळाला.
बंजारा समाजाचा हा विराट मोर्चा केवळ जालन्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील पुढील राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.