महाराष्ट्र

देशरक्षणासाठी झटणारा योद्धा हरपला;भोकरदनचे सुपुत्र संदीप ठाले वीरगतीला

मंगळवारी भोकरदन येथे होणार अंत्यसंस्कार

भोकरदन :
भोकरदन तालुक्यातील वडशेद गावचा सुपुत्र, तर सैन्यदलात कार्यरत असलेला धाडसी जवान संदीप रामराव ठाले यांचे रविवारी (ता.१४) सायंकाळी पुण्यातील सैन्याच्या कमांड रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. परंतु नियतीसमोर त्यांची झुंज अपुरी ठरली आणि केवळ चाळिशीतच हा देशभक्त वीर कायमचा काळाच्या पडद्याआड गेला.

मुळचे वडशेद गावचे असलेले संदीप ठाले हे भोकरदन शहरातील तुळजाभवानी नगर येथे मागील काही वर्षांपासून राहत होते.तर सैन्यदलातील युनिट २४ मराठा लाईट इन फॅन्ट्री, लेह-लद्दाख येथे ते कार्यरत होते. कर्तव्याच्या रेषेत सतत सज्ज असलेला हा सैनिक आजारपणाने हिरावून नेला, याचे दुःख तालुक्यात सर्वत्र व्यक्त होत आहे.

त्यांच्या जाण्याने ठाले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे पत्नी, आई, एक लहान मुलगा आणि दोन कन्या असा परिवार पोरकाच झाला आहे. परिवाराचा आधार, मुलांचा लाडका बाप आणि पत्नीचा साथीदार हरविल्याने संदीप ठाले यांच्या घरात हंबरडा फोडून रडवणारा शोककल्लोळ आहे.

संपूर्ण भोकरदन शहर व परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. “देशासाठी उभा असलेला जवान इतक्या लवकर निघून जाईल, याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल”

त्यांच्यावर मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ वाजता शहरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जवान संदीप ठाले यांच्या निधनाने केवळ कुटुंबिय नव्हे तर संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे. त्यांची देशभक्ती, त्याग आणि शौर्य यांची आठवण कायम स्मरणात राहील.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.