ॲड गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला; पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

जालना:
मराठा आरक्षणाला विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडीवर जालना शहरात मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. जालन्यात सुरू असलेल्या दिपक बोऱ्हाडे यांच्या धनगर उपोषणाला भेट देण्यासाठी गुनरत्न सदावर्ते रविवारी जालन्यात आले होते.
मिळालेली माहिती अशी की, सदावर्तेंचा ताफा रस्त्यावरून जात असताना पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवले होते. मात्र काही आंदोलकांनी पोलिसांना चकमा देत गाडी गाठली आणि काचेवर फटके मारले. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले.
या घटनेत गाडीचे किरकोळ नुकसान झाले, परंतु कोणतीही गंभीर जखम झाली नाही. सदावर्तें यांनी मुंबईसह राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला सातत्याने विरोध दर्शविला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा त्यांनी आक्रमकपणे समाचार घेतला आहे. यापूर्वी मुंबईत त्यांच्या घराबाहेर गाडीच्या काचे फोडल्या होत्या आणि अनेकदा इशारेही देण्यात आले होते.
या घटनेने मराठा आंदोलन आणि स्थानिक राजकीय वातावरणात तणाव निर्माण केला आहे. पोलिस कारवाई आणि राजकीय प्रतिक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.