महाराष्ट्रराजकीय

भोकरदन येथील छत्रपती स्मारकाला नवा आयाम

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या दूरदृष्टीतून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार सुशोभीकरण

भोकरदन संग्रामभूमी न्यूज नेटवर्क:

भोकरदन शहराच्या इतिहासात आणि अस्मितेत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अतुलनीय आहे. शहराच्या अभिमानाचे प्रतीक असलेला अश्वारूढ पुतळा केवळ एक स्मारक नाही, तर जनतेच्या मनातील प्रेरणा, अभिमान आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. आता या पुतळ्याचे सुशोभीकरण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आमदार संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे काम होणार आहे, ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे.

इतिहासाची पावित्र्यभूमी असलेल्या भोकरदन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. शिवप्रेमींच्या हृदयात घर करून बसलेला हा पुतळा म्हणजे भोकरदनची शान आणि अभिमान आहे. मात्र, आता या स्मारकाला नवे भव्य रूप मिळणार आहे. आमदार तथा पंचायती राज समितीचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

हे स्मारक केवळ शोभेचे साधन नाही, तर ते समाजाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो. शिवरायांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी आणि शौर्य यांचा संदेश जर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याला आधुनिक दृष्टीकोनाची जोड देणे अपरिहार्य आहे. या दृष्टीने सुशोभीकरणाचा निर्णय योग्य वेळी घेतला गेला आहे, असे म्हणावे लागेल.
भोकरदन शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र वारशाचा गौरव फक्त तोंडी न करता प्रत्यक्षात दाखवणेही आवश्यक आहे. या स्मारकाचा विकास आराखडा तेच करणार आहे. सुशोभीकरणामुळे शहराची मान उंचावेल, हे निश्चित. परंतु या कामात पारदर्शकता, गुणवत्तेची बांधिलकी आणि दीर्घकालीन दृष्टी हे घटकही तितकेच महत्त्वाचे असणार आहेत.

शहरवासीयांनी या उपक्रमाकडे केवळ एक सौंदर्यवर्धन प्रकल्प म्हणून न पाहता, तो आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा जतन करण्याचा प्रयत्न म्हणून पाहणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य सुशोभीकरण हे केवळ एक विकासकाम न राहता, पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरावा, हीच अपेक्षा.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.