क्राईम
धक्कादायक..! युवक काँग्रेस शहराध्यक्षाकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न!
बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील घटनेने खळबळ

बुलढाणा :
संग्राम भूमी न्यूज नेटवर्क : चिखली शहरात रविवारी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष विशाल उर्फ रिकी काकडे याने बाहेर अफेअर असल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून गॅस पेटवून साडीचा पदर पेटविण्याचा प्रकार घरातच घडला. सुदैवाने विवाहितेच्या सूजबूजेमुळे मोठा अनर्थ टळला.