राजकीय
भोकरदनचे राजकारण उकळत्या टप्प्यावर! चार प्रमुख पक्ष रणांगणात, अपक्षांचा तिखट तडका ; दिग्गजांची प्रतिष्ठा धोक्यात?
नगराध्यक्ष पदासाठी १२ तर सदस्य पदासाठी १५४ अर्ज

भोकरदन – संग्रामभूमी न्यूज नेटवर्क
भोकरदन नगर पालिका निवडणुकीने संपूर्ण तालुक्याचे राकीय तापमान उसळवले आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १२ उमेदवार, तर सदस्य पदासाठी १५४ अर्ज दाखल होऊन एकूण १६६ चे प्रचंड रणांगण
उभे राहिले आहे. मात्र आकड्यांपेक्षा मोठी चर्चा आहे ती या वेळच्या तुफानी राजकीय घडामोडींची.
