जिल्हा

भोकरदन येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

भोकरदन : येथील रत्नमाला लॉन्स येथे दिनांक ६ जानेवारी रोजी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळख असलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

सकाळी आयोजित कार्यक्रमात मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख इरफान यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेला दिलेल्या दिशादर्शक कार्याचा गौरव केला. समाजप्रबोधन, सत्यनिष्ठा व निर्भीड लेखन हीच खरी पत्रकारितेची ओळख असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव सांडू पाटील नामदे, ज्येष्ठ पत्रकार विजय सोनवणे, रविंद्र देशपांडे, तुषार पाटील, दीपक सोळंके, सुरेश बनकर, नानासाहेब वानखेडे, संजय पैठणकर, सुनील जाधव, वैभव सोनवणे, अमोल शिंदे , सुरेश गिराम, सुरेश शेळके, शेख सलीम, युवराज पगारे, प्रताप साळवे, इम्रान खान, कमलकिशोर जोगदंडे, विश्वास धसाळ, विलास खांडवे, अमित लोहाडे आदी पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व पत्रकारांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांना आत्मसात करण्याच्या संकल्पाने करण्यात आला.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.