भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी बिनविरोध; पत्रकार एकजुटीचा निर्धार

भोकरदन :
तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शहरातील जाफराबाद रस्त्यावरील रत्नमाला लॉन्स येथे आयोजित बैठकीत संघटनेच्या बळकटीसाठी एकजुटीचा आणि सक्रिय कामकाजाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस जालना जिल्हाध्यक्ष फकिरा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर मावळते अध्यक्ष शेख इरफान यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विजय सोनवणे, रविंद्र देशपांडे, गणेश औटी, महेश देशपांडे, सुरेश बनकर आणि नानासाहेब वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी संघटन अधिक सक्षम करून पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोसपणे आवाज उठविणे, तसेच पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी सामूहिकपणे कार्य करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी सांडू पाटील नामदे यांची, तर सचिवपदी दिपक सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जाहीर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
-
कार्याध्यक्ष : युवराज पगारे
-
उपाध्यक्ष (शहर) : सुरेश शेळके, शेख सलीम
-
उपाध्यक्ष (ग्रामीण) : रमेश जाधव, अरुण ठोंबरे, शेख जफर
-
कोषाध्यक्ष (शहर) : सुरेश गिराम
-
कोषाध्यक्ष (ग्रामीण) : श्याम पुंगळे, रघुनंदन खंडेलवाल
-
सहसचिव (शहर) : रमेश इंगळे
-
सहसचिव (ग्रामीण) : संदीप देशमुख
-
कार्यकारिणी सदस्य : शहजाद मिर्झा, विजय बावस्कर, शेख अजीज, रामसिंग सोळंके, फैजुल्ला पठाण, गणेश पंडित, अमित लोहाडे, मिलिंद सावंत, डी. एन. गावंडे, प्रताप साळवे, आयुब पठाण.
या प्रसंगी संजय पैठणकर, सुनील जाधव, वैभव सोनवणे, विलास खांडवे, तुषार पाटील, कमलकिशोर जोगदंडे, इमरान खान, शेख सादिक, अकबर पठाण, फुलसिंग शिंदे, गजानन देशमुख, रवींद्र लोखंडे, अमोल शिंदे, सागर देशमुख, प्रा. राम शिंदे, शिवाजी बोर्डे, आयुब खान यांच्यासह पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान परस्पर सहकार्य, संघटनात्मक बांधिलकी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ उभारण्याचा संकल्प करण्यात आला. नव्या कार्यकारिणीमुळे संघटनेच्या कामकाजाला गती मिळून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सक्षम आणि ठोस भूमिका घेतली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल देशमुख यांनी केले, तर समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला.
▓▓ विशेष उल्लेख ▓▓
सदरील कार्यक्रमासाठी रत्नमाला लॉन्सचे संचालक राजेंद्र देशमुख यांनी उदारपणे सभागृह उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेच्या उपक्रमांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.