महाराष्ट्र

जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी शपथ ; महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल

मुंबई संग्रामभूमी न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेल्या जिष्णू देव वर्मा यांनी मंगळवारी मुंबई येथील राजभवनात आयोजित समारंभात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. या शपथविधीनंतर जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली.

राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिष्णू देव वर्मा हे सोमवारी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्य सरकारच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर राजभवनात त्यांना राज्य पोलिस दलाकडून मानवंदना देण्यात आली.

जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्रिपुरा राज्यात अनेक वर्षे सक्रिय राजकारण केले असून २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. वित्त, ऊर्जा, ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी त्या काळात सांभाळली होती.

  • केंद्र शासनाने अलीकडेच विविध राज्यांतील राज्यपालांमध्ये फेरबदल केला असून त्यानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. शपथविधीनंतर त्यांनी राज्याच्या घटनात्मक प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला असून राज्यातील प्रशासन, शासन आणि घटनात्मक प्रक्रियांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.